Saturday, November 19, 2011

म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांची १० महत्त्वाची कर्तव्ये!

म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांची १० महत्त्वाची कर्तव्ये!

धनश्री राणे, सोमवार, १४ नोव्हेंबर २०११
वरिष्ठ विश्लेषक, फंडसुपरमार्ट डॉट कॉम
feedback@fundsupermart.com
चिनी कवी आणि तत्त्वज्ञ लाऊझीने एकदा म्हटले होते, ‘‘जे ज्ञानी आहेत ते कधीच भविष्यवाणी करीत नाहीत. भविष्याचे आडाखे बांधणारे कधीच ज्ञानी नसतात.’’ भविष्याचा जर खरेच कुणाला अचूक अंदाज बांधता आला असता तर जगभरातील सर्व ज्योतिषी अब्जाधीश बनलेले दिसले असते. एक गुंतवणूकदार म्हणून बाजार कोणत्याही आवर्तनात का असेना, आपल्या परताव्याचे प्रमाण अधिकाधिक कसे राहील, हेच पाहणे केवळ आपल्या हाती असते. म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांनी अशा कोणत्या मूलभूत गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, हे आपण पाहूया..

संपूर्ण लेख लोकसत्ताच्या ह्या दुव्यावर:

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=193458:2011-11-13-17-24-58&catid=127:2009-08-06-07-25-02&Itemid=139

Sunday, October 09, 2011

वॉशिंग मशीन घेत आहात?

वॉशिंग मशीनमध्येही असंख्यकंपन्या आणि त्यांची अनेकउत्पादने उपलब्ध असल्याने ऐनखरेदीच्या वेळी गोंधळ उडतो .त्यामुळे वॉशिंग मशीनची खरेदीकरताना पुढील वैशिष्ट्येविचारात घ्यावीत .

Wednesday, August 10, 2011

'एटीएम कार्ड' वापराचे नवे नियम

बँकांची 'ऑटोमेटेड टेलर मशिन्स' अर्थात 'एटीएम'चा वापर सहज आणि योग्य पद्धतीने करता येण्यासाठी गेल्या काही महिन्यांत काही नवे नियम जारी करण्यात आले आहेत. त्याबाबतची अद्ययावत माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. ती अशी :

'एटीएम कार्ड' वापराचे नवे नियम (म.टा.)
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9559858.cms

Tuesday, June 07, 2011

पाच लाखापर्यंतच्या उत्पनाला आता 'रिटर्न'ची गरज नाही

आथिर्क वर्ष 2010-11 मध्ये ज्यांचे वेतन व व्याज उत्पन्न पाच लाख रु.पेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना यापुढे आयकर विवरणपत्र सादर करण्याची गरज राहणार नाही. 'सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस'च्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी येथे ही माहिती दिली. हा अधिकारी म्हणाला: यामुळे देशभरातील 85 लाख पगारदार करदात्यांना आता 'रिटर्न' भरावा लागणार नाही.         
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8754927.cms              

Sunday, May 29, 2011

‘एटीएम’मध्ये अडकलेले पैसे सात दिवसांत मिळणार


'राँगफुल एटीएम डेबिट'चा परतावा सात दिवसांत

भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जारी केलेल्या आदेशात अशा 'राँगफुली 'एटीएम डेबिटेड' रकमांचा परतावा बँक ग्राहकाला त्याची तक्रार आल्यानंतर सात दिवसांत देण्यास सांगितले आहे. बँकांनी सात दिवसांत हा 'रिफंड' न दिल्यास संबंधित ठेवीदाराला दररोज १०० रु. प्रमाणे दंड द्यावा लागणार आहे. 'एटीएम ट्रॅन्झॅक्शन' फसते, तेव्हा अशा 'फेल्ड' व्यवहाराची रक्कम ठेवीदाराला न मिळता वजा मात्र होते.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8612365.cms


‘एटीएम’मध्ये अडकलेले पैसे सात दिवसांत मिळणार
पैशाची अगदीच निकड असेल तेव्हाच ‘एटीएम’ दगा देते. कार्डच वापस येते, पैसे मिळत नाहीत, अनेकदा पैसे न मिळताच परस्पर खात्यावरून वजा होतात. वेळेवर पैसे तर मिळत नाहीतच पण हे पैसे मिळवण्यासाठी बँकेच्या नाकदुर्‍या काढाव्या लागतात. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने नवीन नियमच केला असून, या नियमानुसार एटीएममधून तांत्रिक कारणामुळे पैसे मिळाले नाहीत तर ग्राहकाने तक्रार केल्यानंतर बँकेने सात दिवसांच्या आत हे पैसे परत द्यायचे आहेत. हे पैसे देण्यास टाळाटाळ झाली तर बँकेला दर दिवसाला 100 रुपये जास्तीचे द्यावे लागणार आहेत. 1 जुलैपासून हा नवीन नियम लागू होणार आहे.
http://www.saamana.com/2011/May/29/Link/rashtriya1.htm

Monday, April 25, 2011

लग्न सोहळ्याकरीता विमा

लग्नासारख्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटनेवर लाखो रुपये खर्च करत असाल तरे ते निर्विघ्न पार पडावे म्हणून त्यासाठी आवश्यक तितका विमाही उतरवलायला हवा . विमा घेण्यापूर्वी पुढील गोष्टी लक्षात घ्यावात.


पूर्ण लेखन मटा च्या ह्या दुव्यावर : विवाह सोहळ्याला नजर न लागो!

Friday, February 04, 2011

थ्रीजी मोबाइल

जगा '३ जी' लाईफ...

आज "थ्री जी' तंत्रज्ञानाने मोबाईल विश्‍वात अभूतपूर्व क्रांतीचे पाऊल टाकले आहे. मल्टिमीडिया, अतिप्रचंड गतीची मोबाईल इंटरनेट सेवा, सुस्पष्ट व्हिडीओ फुटेज, व्हिडीओ कॉलिंग, लाईव्ह स्ट्रिमिंग व टिव्ही, ईमेल, अधिक क्षमतेने गाणी व अल्बम, एवढेच नव्हे संपूर्ण चित्रपट डाऊनलोड, व्हॉईस कॉल व व्हॉईस मेसेजिंग अशा भरपूर गोष्टी मोबाईलवर शक्‍य झाल्या आहेत.
पूर्ण लेख सकाळच्या ह्या दुव्यावर...

______________________________________________________________
 
मोबाइल थ्रीजी बिलाची चिंता नसावी!

मोबाइल फोन सेवा पुरविणा-या सर्वच कंपन्या एकापाठोपाठ थ्रीजी सेवा पुरवू लागल्या आहेत. ही सेवा सुरू केली तर आपले फोनबिल वाढणार की काय, अशी चिंता अनेक मोबाइलधारकांना वाटू लागली आहे. परंतु, तुम्ही विचारपूर्वक प्लॅनची निवड केली तर ही चिंता वाटण्याची आवश्यकता नाही. 

 पूर्ण लेख मटाच्या ह्या दुव्यावर...

Saturday, January 01, 2011

झाडाआडून 'सावज' शोधणे नियमबाह्य

मुंबईच्या कोणत्याही ट्रॅफिक सिग्नलवर नजर टाकली तर, वाहतूक पोलीस झाडाच्या कोपऱ्यात किंवा रस्त्याच्या आडोशाला उभे राहून 'सावज' हेरताना दिसतील. सिग्नल तोडून पळणारा वाहनचालक दिसला तर, रस्त्यात पुढे येऊन 'झडप' घालणारे वाहतूक पोलीस सर्रास नजरेस पडतात, पण; नव्या वर्षात मुंबईकरांनाच पोलिसांच्या या 'वसुली मोहिमे'ला ब्रेक लावता येईल! कारण, वाहतुकीचे नियंत्रण करताना झाडाच्या मागे किंवा कोपऱ्यात उभे राहणे नियमात बसत नसल्याचे मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने मान्य केले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या या नियमबाह्य वसुलीपासून नव्या वर्षात मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

पूर्ण बातमी येथे वाचावी