Friday, January 04, 2013

आर्थिक शिस्तीचे टप्पे

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17879322.cms

आर्थिक शिस्त लावून घेण्याचा निश्चय एका दमात पूर्ण होणेअशक्य आहे एकदम मोठी उडी घेऊन तो अर्ध्यातचसोडण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने हे ध्येय्य गाठता येईल 

पहिली पायरी 

तुमच्याजवळ काय आहे ते जाणून घ्या महिन्याचा खर्च जाणून घेण्यासाठी रोजचा खर्च लिहून ठेवा .स्वयंपाकघरात कॅलेंडरवर ही नोंद सहज करता येते त्याचबरोबर एका साध्या कागदावर किंवा कम्प्युटरच्याएक्सेलशीटमध्ये स्वतःचे उत्पन्न डोक्यावर असलेली कर्जे क्रेडिट कार्डे इन्शुरन्स व गुंतवणुका यांचे विवरणलिहून काढा सिबिलच्या वेबसाइटवर तुमचा क्रेडिट रिपोर्टही घ्या ही सगळी कामे जानेवारी महिन्याच्याअखेरपर्यंत पूर्ण करणे सहज शक्य आहे 

दुसरी पायरी 

तुमच्या एकूण उत्पन्नापैकी कमाल ४० रक्कम कर्जफेडीकरता वापरली जात असेल व एकूण उत्पन्नापैकी किमान३० रक्कम तुम्ही गुंतवत असाल तर तुम्ही उत्कृष्ट आर्थिक स्थितीत आहात पण अशी परिस्थिती नसेल तर मात्रथोडा विचार करायला हवा उत्पन्नापैकी फारच जास्त रक्कम कर्जफेडीकरता वापरली जात असेल तर थोडे कर्जाचेविवरण बघा वाढत्या व्याजदरामुळे केवळ गृहकर्जाचे हप्ते भरताना अशी परिस्थिती असेल तर त्यावर लगेच काहीउपाय नाही येत्या वर्षात तुमचे उत्पन्न वाढले व व्याजदर खाली आले तर थोडी फार सुधारणा होईल पणचमत्काराची अपेक्षा बाळगू नका परंतु अनेकदा गृह कर्जापेक्षा इतर कर्जांची परतफेड करण्यातच बहुतांशी उत्पन्नखर्ची पडते अशा वेळी मात्र परिस्थितीत सुधारणा करणे कदाचित शक्य होऊ शकते विशेषत क्रेडिट कार्डच्याकर्जात तुम्ही अडकले असलात तर जरूर त्यातून सुटू शकता सर्व क्रेडिट कार्डांवर किती रक्कम देणे आहे ते शोधूनकाढा मग तुमच्या घराच्या तारणावर किंवा सोने तारणावर कर्ज घ्या या कर्जावरील व्याजदर क्रेडिट कार्डावरीलव्याजदरापेक्षा कमी असतो तसेच कर्जफेडीची मुदतही अधिक असते हे शक्य नसेल तर पर्सनल लोन घ्या पणहळूहळू या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडा कर्जाची पुनर्रचना करायला तुम्हाला एखादा महिना पुरेसा आहे 

तिसरी पायरी 

अनावश्यक खर्च टाळा तुमच्याजवळ अनेक क्रेडिट कार्डे असतील तर त्यातील दोन किंवा तीनच ठेवून बाकीचीबँकेस परत करा यामुळे तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्येही हळूहळू सुधारणा होईल 

चौथी पायरी 

दर वर्षी एप्रिल महिन्यात आयकरशी संबधित गुंतवणुकांचे नियोजन करा या वर्षीचे गुंतवणूक नियोजन अजूनकेले नसेल तर ते आताच करा मार्चच्या शेवटच्या आठवड्याची वाट बघू नका घाईत घेतलेले बरेच निर्णयचुकतात करबचत आणि आपले वित्तीय नियोजन यांची सांगड घालणे शक्य आहे एक उदाहरण बघू तुम्हीघेतलेल्या गृह कर्जाच्या मुद्दलाच्या परतफेडीवर १ लाख रु पर्यंत करात वजावट मिळते वर्षी जर तुमचे मुद्दलपरतफेड १ लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही थोडे अधिक कर्ज मुदतपूर्व फेडू शकता यामुळे तुम्हाला पूर्णकरवजावटही मिळते व कर्जाचा भारही थोडा कमी होतो समजा तुमच्या मासिक हप्त्यांतून तुम्ही ६० हजाररुपये मुद्दल फेडत असाल तर ४० हजाराची एकरकमी मुदतपूर्व कर्जफेड करा यामुळे पूर्ण १ लाख रु कर वजावटमिळेल 

पाचवी पायरी 

दीर्घकालीन वित्तीय नियोजनावर भर द्या एकदा दीर्घकालीन धोरण ठरले की मग प्रवास सुखाचा होतो बहुतांशवेळा कुठे जायचे हे माहीत नसल्याने आपण भरकटतो हे टाळायचे असेल तर थोडा वेळ काढून स्वत चे धोरणठरवा गरज पडल्यास तज्ञ मंडळींची मदत घ्या 

सौजन्यः राजीव राज सह संस्थापक व संचालक क्रेडिटविद्या )