http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17879322.cms
आर्थिक शिस्त लावून घेण्याचा निश्चय एका दमात पूर्ण होणेअशक्य आहे . एकदम मोठी उडी घेऊन तो अर्ध्यातचसोडण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने हे ध्येय्य गाठता येईल .
पहिली पायरी
तुमच्याजवळ काय आहे ते जाणून घ्या . महिन्याचा खर्च जाणून घेण्यासाठी रोजचा खर्च लिहून ठेवा .स्वयंपाकघरात कॅलेंडरवर ही नोंद सहज करता येते . त्याचबरोबर एका साध्या कागदावर किंवा कम्प्युटरच्याएक्सेलशीटमध्ये स्वतःचे उत्पन्न , डोक्यावर असलेली कर्जे , क्रेडिट कार्डे , इन्शुरन्स व गुंतवणुका यांचे विवरणलिहून काढा . सिबिलच्या वेबसाइटवर तुमचा क्रेडिट रिपोर्टही घ्या . ही सगळी कामे जानेवारी महिन्याच्याअखेरपर्यंत पूर्ण करणे सहज शक्य आहे .
दुसरी पायरी
तुमच्या एकूण उत्पन्नापैकी कमाल ४० % रक्कम कर्जफेडीकरता वापरली जात असेल व एकूण उत्पन्नापैकी किमान३० % रक्कम तुम्ही गुंतवत असाल तर तुम्ही उत्कृष्ट आर्थिक स्थितीत आहात . पण अशी परिस्थिती नसेल तर मात्रथोडा विचार करायला हवा . उत्पन्नापैकी फारच जास्त रक्कम कर्जफेडीकरता वापरली जात असेल तर थोडे कर्जाचेविवरण बघा . वाढत्या व्याजदरामुळे केवळ गृहकर्जाचे हप्ते भरताना अशी परिस्थिती असेल तर त्यावर लगेच काहीउपाय नाही . येत्या वर्षात तुमचे उत्पन्न वाढले व व्याजदर खाली आले तर थोडी फार सुधारणा होईल . पणचमत्काराची अपेक्षा बाळगू नका . परंतु , अनेकदा गृह कर्जापेक्षा इतर कर्जांची परतफेड करण्यातच बहुतांशी उत्पन्नखर्ची पडते . अशा वेळी मात्र परिस्थितीत सुधारणा करणे कदाचित शक्य होऊ शकते . विशेषत : क्रेडिट कार्डच्याकर्जात तुम्ही अडकले असलात तर जरूर त्यातून सुटू शकता . सर्व क्रेडिट कार्डांवर किती रक्कम देणे आहे ते शोधूनकाढा . मग तुमच्या घराच्या तारणावर किंवा सोने तारणावर कर्ज घ्या . या कर्जावरील व्याजदर क्रेडिट कार्डावरीलव्याजदरापेक्षा कमी असतो , तसेच कर्जफेडीची मुदतही अधिक असते . हे शक्य नसेल तर पर्सनल लोन घ्या . पणहळूहळू या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडा . कर्जाची पुनर्रचना करायला तुम्हाला एखादा महिना पुरेसा आहे .
तिसरी पायरी
अनावश्यक खर्च टाळा . तुमच्याजवळ अनेक क्रेडिट कार्डे असतील तर त्यातील दोन किंवा तीनच ठेवून बाकीचीबँकेस परत करा . यामुळे तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्येही हळूहळू सुधारणा होईल .
चौथी पायरी
दर वर्षी एप्रिल महिन्यात आयकरशी संबधित गुंतवणुकांचे नियोजन करा . या वर्षीचे गुंतवणूक नियोजन अजूनकेले नसेल तर ते आताच करा . मार्चच्या शेवटच्या आठवड्याची वाट बघू नका . घाईत घेतलेले बरेच निर्णयचुकतात . करबचत आणि आपले वित्तीय नियोजन यांची सांगड घालणे शक्य आहे . एक उदाहरण बघू . तुम्हीघेतलेल्या गृह कर्जाच्या मुद्दलाच्या परतफेडीवर १ लाख रु . पर्यंत करात वजावट मिळते . वर्षी जर तुमचे मुद्दलपरतफेड १ लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही थोडे अधिक कर्ज मुदतपूर्व फेडू शकता . यामुळे तुम्हाला पूर्णकरवजावटही मिळते व कर्जाचा भारही थोडा कमी होतो . समजा , तुमच्या मासिक हप्त्यांतून तुम्ही ६० हजाररुपये मुद्दल फेडत असाल तर ४० हजाराची एकरकमी मुदतपूर्व कर्जफेड करा . यामुळे पूर्ण १ लाख रु . कर वजावटमिळेल .
पाचवी पायरी
दीर्घकालीन वित्तीय नियोजनावर भर द्या . एकदा दीर्घकालीन धोरण ठरले की मग प्रवास सुखाचा होतो . बहुतांशवेळा कुठे जायचे हे माहीत नसल्याने आपण भरकटतो . हे टाळायचे असेल तर थोडा वेळ काढून स्वत : चे धोरणठरवा . गरज पडल्यास तज्ञ मंडळींची मदत घ्या .
( सौजन्यः राजीव राज , सह - संस्थापक व संचालक , क्रेडिटविद्या )

No comments:
Post a Comment