मुंबईच्या कोणत्याही ट्रॅफिक सिग्नलवर नजर टाकली तर, वाहतूक पोलीस झाडाच्या कोपऱ्यात किंवा रस्त्याच्या आडोशाला उभे राहून 'सावज' हेरताना दिसतील. सिग्नल तोडून पळणारा वाहनचालक दिसला तर, रस्त्यात पुढे येऊन 'झडप' घालणारे वाहतूक पोलीस सर्रास नजरेस पडतात, पण; नव्या वर्षात मुंबईकरांनाच पोलिसांच्या या 'वसुली मोहिमे'ला ब्रेक लावता येईल! कारण, वाहतुकीचे नियंत्रण करताना झाडाच्या मागे किंवा कोपऱ्यात उभे राहणे नियमात बसत नसल्याचे मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने मान्य केले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या या नियमबाह्य वसुलीपासून नव्या वर्षात मुंबईकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पूर्ण बातमी येथे वाचावी
No comments:
Post a Comment