'राँगफुल एटीएम डेबिट'चा परतावा सात दिवसांत
भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जारी केलेल्या आदेशात अशा 'राँगफुली 'एटीएम डेबिटेड' रकमांचा परतावा बँक ग्राहकाला त्याची तक्रार आल्यानंतर सात दिवसांत देण्यास सांगितले आहे. बँकांनी सात दिवसांत हा 'रिफंड' न दिल्यास संबंधित ठेवीदाराला दररोज १०० रु. प्रमाणे दंड द्यावा लागणार आहे. 'एटीएम ट्रॅन्झॅक्शन' फसते, तेव्हा अशा 'फेल्ड' व्यवहाराची रक्कम ठेवीदाराला न मिळता वजा मात्र होते.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8612365.cms
‘एटीएम’मध्ये अडकलेले पैसे सात दिवसांत मिळणार
पैशाची अगदीच निकड असेल तेव्हाच ‘एटीएम’ दगा देते. कार्डच वापस येते, पैसे मिळत नाहीत, अनेकदा पैसे न मिळताच परस्पर खात्यावरून वजा होतात. वेळेवर पैसे तर मिळत नाहीतच पण हे पैसे मिळवण्यासाठी बँकेच्या नाकदुर्या काढाव्या लागतात. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने नवीन नियमच केला असून, या नियमानुसार एटीएममधून तांत्रिक कारणामुळे पैसे मिळाले नाहीत तर ग्राहकाने तक्रार केल्यानंतर बँकेने सात दिवसांच्या आत हे पैसे परत द्यायचे आहेत. हे पैसे देण्यास टाळाटाळ झाली तर बँकेला दर दिवसाला 100 रुपये जास्तीचे द्यावे लागणार आहेत. 1 जुलैपासून हा नवीन नियम लागू होणार आहे.
http://www.saamana.com/2011/May/29/Link/rashtriya1.htm
No comments:
Post a Comment