नव्या आर्थिक वर्षात, म्हणजे १ एप्रिल २०१० पासून आपल्या बचत खात्यातील रोजच्या शिलकीवर व्याज देण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिलेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना आज मिळणा-या व्याजात १६ ते १८ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
अधिक माहिती येथे वाचा:
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5745501.cms
३ वर्षांपूर्वी मी हा पहिला (बहुधा दुसरा, कारण ब्लॉग बनविण्याबद्दल जास्त माहित नव्हते) ब्लॉग बनविला. त्यात एक आवडलेला विचार लिहिला. आता विचार केला की, वर्तमानपत्रात येणाया महत्वपूर्ण बातम्या, लेख ह्यांचा दुवा इथे टाकावा, जेणेकरून नंतर मला किंवा इतरांना इथे येऊन त्यावर नजर टाकता येईल. त्या वाचण्यास किती वेळ जाईल? जेमतेम १० मिनिटे. म्हणून नाव तसेच ठेवले, आपल्याजवळ दहा मिनिटे आहेत का?
Tuesday, March 30, 2010
Sunday, January 03, 2010
लाचखोरी होतेय? मग एसएमएस करा!
आजवर शेकडो लाचखोरांना अटक करुनही ' भ्रष्टाचाराची माया ' कमी होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर ' ऍंटी करप्शन ब्युरो ' तर्फे विभागातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींसाठी स्वतंत्र मोबाईल क्रमांक जाहीर केला आहे. त्यावरील ' एसएमएस ' चीही दखल घेतली जाणार आहे
सविस्तर वृत्त येथे वाचा
सविस्तर वृत्त येथे वाचा
Tuesday, October 20, 2009
आता इन्कम टॅक्सच्या नावावर फसवणूक
आता इन्कम टॅक्सच्या नावावर फसवणूक
तुम्हाला इन्कम टॅक्सकडून रिफंड मिळणार आहे असा इमेल आला तर लगेच हुरळून जाऊ नका. कारण तो मेल केवळ खोटाच नसेल तर तुमच्याकडून महत्त्वाची माहिती काढून घेऊन तुमची लुबाडणूक होऊ शकेल.

Tuesday, May 19, 2009
गाठा आपल्या खासदारांना!
गाठा आपल्या खासदारांना!
महामुंबईचे दहा खासदार लोकसभेत पोहोचलेत. ते आपल्याशी संपर्क ठेवोत अगर न ठेवोत. आपण त्यांना गाठायला हवं, सूचनांसाठी आणि जाब विचारण्यासाठी. त्यांची संपर्क माहिती.

Wednesday, April 08, 2009
आरबीआयच्या नावावर फसवेगिरी
आरबीआयच्या नावावर फसवेगिरी
मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई
ऑनलाइन फसवणाऱ्यांनी आता रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाच्या नावाचा गैरवापर करण्यास सुरूवात केली आहे.
तुमच्या नावावर भलीमोठी रक्कम जमा करायची आहे असे सांगून हे गुन्हेगार सर्वसामान्याकडून त्याचा बँक अकाऊंट क्रमांक, नाव, पत्ता, पासवर्ड आणि आयपीन नंबर विचारतात. हे करताना ते थेट आरबीआयची लिंक देतात. या लिंकमधील आरबीआयचे मास्टहेड, विभागाचे नाव इत्यादी कम्प्युटरच्या पडद्यावर दिसायला लागते.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4368660.cms

Thursday, April 02, 2009
Thursday, March 26, 2009
Thursday, September 04, 2008
बीग रिस्क!
बीग रिस्क!
गाडी चालवताना अचानक गाडीने पेट घेतलाय... किंवा गाडीचा छोटासा अपघात होऊन शॉटसकिर्ट होऊन गाडी जळू लागली असं घडतं क्वचितच. पण असं झालं तर आपण अगदीच हबकून जातो. अर्थात, ते स्वाभाविकही आहे. कारण आख्खी गाडी जळेल, अशी कल्पनाही आपण केलेली नसते . या संकटाला तांेड द्यायला आपण तयार नसतो. समजा आग लागलीच तर काय करायचं याचा आपण विचारही केलेला नसतो. त्यामुळे डोळ्यादेखत गाडी जळत राहिलेली पाहणं या पलीकडे हातात काही उरत नाही.

Monday, August 25, 2008
'इन्ऑपरेटिव्ह' खात्यांवर ३.५ टक्के व्याज द्या
"'इन्ऑपरेटिव्ह' खात्यांवर ३.५ टक्के व्याज द्या"
बँकांचे जे ठेवीदार त्यांच्या बचत खात्यावर नियमित व्यवहार करीत नसतील व मुदत ठेवींची मुदत संपल्यानंतर रक्कम काढून घेत नसतील किंवा नूतनीकरण करीत नसतील त्यांना यापुढेही ३.५ टक्के दराने व्याज देण्याचे निदेर्श भारतीय रिर्झव्ह बँकेने दिले आहेत.

Sunday, August 17, 2008
Thursday, June 05, 2008
Wednesday, June 04, 2008
Saturday, May 03, 2008
Tuesday, April 15, 2008
Friday, April 11, 2008
Wednesday, April 09, 2008
Friday, September 23, 2005
आपल्याजवळ दहा मिनिटे आहेत का?
आपल्याजवळ दहा मिनिटे आहेत का?
तुम्ही तुमच्या देशासाठी दहा मिनिटे देऊ शकता का? जर हे शक्य असेल, तर पुढील मजकूर वाचा : तुम्ही म्हणता की, आपले सरकार अकार्यक्षम आहे. तुम्ही म्हणता की, आपले कायदे फारच जुनेपुराणे, म्हणून कालबाह्य झाले आहेत. तुम्ही म्हणता की, महानगरपालिका कचऱ्याचे ढिगारे उचलण्यात दिरंगाई करते. तुम्ही म्हणता की, फोन काम करत नाहीत. रेल्वेसेवा म्हणजे मोठा विनोद आहे. विमानसेवा ही जगातील अत्यंत भिकार सेवा आहे आणि पत्र पत्त्यावर कधीही पोचत नाहीत. तुम्ही म्हणता की, आपला देश खड्ड्यात गेला आहे. तुमचे हे रडगाणे सतत चालू असते; पण याबाबत सुधारणा व्हावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता? आपले कोडकौतुक केले जावे, अशा आशेने आपण आरामात हे सारे अलिप्तपणे बघत बसतो आणि आपण काहीही न करता, सरकारने सर्व काही केले पाहिजे अशी आपली अपेक्षा असते. सरकारने सर्वत्र स्वच्छता राखावी, अशी आपली अपेक्षा असते; पण कचरा-घाण इतस्तत: टाकण्याची एकही संधी आपण सोडत नाही किंवा वाटेत पडलेला कागदाचा एकही कपटा उचलून कचरापेटीत टाकत नाही. रेल्वेने स्वच्छ प्रसाधनगृहे पुरवावीत, अशी आपली अपेक्षा असते; पण या प्रसाधनगृहांचा योग्य प्रकारे कसा वापर करावा, हे शिकावेसे आपणाला कधीही वाटणार नाही. इंडियन एअरलाइन्स व एअर इंडियाने सवोर्त्तम जेवण व प्रसाधने पुरवावीत, असे आपल्याला वाटते; पण भुरट्या चोऱ्या करण्याची एकही संधी आपण कधी सोडत नाही. मग आपण काय सबब देतो? ही संपूर्ण व्यवस्थाच आमूलाग्र बदलायला हवी. मग या व्यवस्थेचा कायापालट करणार तरी कोण? आणि या व्यवस्थेचे घटक तरी कोणते? आपण आपल्या सोयीनुसार असे समजतो की, या व्यवस्थेत शेजारीपाजारी, अन्य कुटुंबीय, इतर शहरवासी, अन्य जातीजमाती आणि सरकार यांचा अंतर्भाव असतो. मात्र या व्यवस्थेत तुमचा व माझा काहीही संबंध नाही. या व्यवस्थेत खरोखरच काहीतरी सुधारणा, विधायक योगदान करण्याची जेव्हा पाळी येते, तेव्हा आपण आपल्याला आपल्या कुटुंबासह एका सुरक्षित कोशात कोंडून घेतो आणि दूरवरच्या अन्य देशांकडे बघत बसतो किंवा कोणी 'मिस्टर क्लीन' येईल आणि जणू जादूची कांडी फिरवून सारे कसे स्वच्छ करील, अशी वाट पाहत बसतो. प्रिय भारतीयांनो, तुमचा हा उद्वेग खूपच विचारप्रवर्तक आहे आणि तो आपणाला अंतर्मुख करायला भाग पाडणाराही आहे. तसेच तो आपल्या सदसद्विवेकबुद्धीला टोचणी लावणाराही आहे. जॉन एफ. केनेडी यांनी आपल्या देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणाची आठवण मी तुम्हाला करून देऊ इच्छितो. ते म्हणाले होते, 'आपला देश आपल्यासाठी काय करू शकतो, हे विचारू नका, तर आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो, हे स्वत:ला विचारा.' भारताच्या प्रथम नागरिकांच्या दहा मिनिटांच्या संदेशाने आम्हाला आमच्या युवा वाचकांसाठी हे जीवनचरित्र प्रकाशित करण्याची प्रेरणा दिली. आम्हाला आशा आहे की, ते आपल्या जीवनातील अत्यंत रमणीय अशा काळात डॉ. कलाम यांच्या सदाबहार, प्रेरणादायी संदेशातून प्रेरणा घेतील आणि 'स्वप्ने पाहा, स्वप्ने पाहत राहा, स्वप्ने विचारात रूपांतरित होतील आणि विचार कार्यरूपाने साकारतील.'
- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

Subscribe to:
Posts (Atom)